– संगणक साहित्य, केबल वायर, इलेक्ट्रॉनिक वस्तू केले जमा
– पर्यावरण संवर्धन पंधरवडा निमित्त मनपाचे विशेष अभियान
नागपूर :- मनपाद्वारे पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यानिमित्त ‘विशेष स्वच्छता अभियानांतर्गत आपला परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील, कार्यालयातील सर्व निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू मनपाच्या ई-कचरा ‘E-Waste Collection Center’ वर जमा करून या अभियानाला नागपूरकरांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
एका दिवसात शहरातून संगणक साहित्य, केबल वायर, इलेक्ट्रॉनिक वस्तू असे निरुपयोगी ई-कचरा या वस्तूं स्वीकार केंद्रांवर जमा करण्यात आले. या प्रतिसादातून नागपूरकरांनी शहर स्वच्छ ठेवण्याची आणि पुनर्वापराची संस्कृती जपण्याची आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे.
नागपूर महानगरपालिकेच्यावतीने 5 ते 21 जून या कालावधीत संपूर्ण शहरात ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, विरोधी पक्ष नेता संजय महाकाळकर, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम. एम, अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम यांच्या निर्देशानुसार ७५ केंद्रांवर ई-कचरा संकलन केंद्रावर मोहीम राबविण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सफाई कर्मचारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.

शहरात एकाच दिवशी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. नागरिकांच्या सोयीसाठी मनपा मुख्यालयामध्ये एक, मनपाचे 10 झोनल कार्यालय, मनपाच्या 29 मध्ये, ग्रंथालय मध्ये 25 व RRR (Reduce, Reuse, Recycle) Centre येथे 10 असे एकूण ७५ ई-कचरा (E-Waste) संकलन केंद्र उभारण्यात आले होते. शिवाय संकलन वाहनातून घराघरातून ई-कचरा संकलन करण्यात आले.
गांधीबाग झोन मधील साने गुरुजी विद्यालयात उभारण्यात आलेल्या मध्ये ई-कचरा (E-Waste) संकलन केंद्रात नागरिकांनी आपल्या घरातील ई-कचरा जमा केला. यावेळी सहाय्यक आयुक्त,घनश्याम पंधरे, झोनल स्वच्छता अधिकारी सुरेश खरे, कर अधीक्षक प्रशांत डूडूरे, यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. अशीनगर झोन मध्ये इ-कचरा (E-Waste) संकलन केंद्रात नागरिकांनी आपल्या घरातील ई-कचरा जमा केला. यावेळी झोनल स्वच्छता अधिकारी भोला खोब्रागडे, स्वच्छता निरीक्षक रोशन जांभूळकर यांच्यासह नागरिकांनी सहभाग नोंदविला.
याचबरोबर हनुमाननगर झोन, लकडगंज झोन, नेहरूनगर झोन, धंतोली झोन, धरमपेठ झोन, लक्ष्मीनगर झोन मधील विविध केंद्रात नागरिकांनी आपल्या घरातील, कार्यालयातील सर्व निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू मनपाच्या ‘E-Waste Collection Center’ वर जमा केली.
यावेळी नागरिकांनी सुद्धा आपला परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील, कार्यालयातील सर्व निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू,साहित्य कचऱ्यात न फेकता किंवा घरात साठवून न ठेवता,आपल्या परिसरातील मनपाच्या ई-कचरा ‘E-Waste Collection Center’ वर जमा करून या महा-स्वच्छता मोहिमेत आपले योगदान दिले.







