spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्र युवा शासन पार्टीची स्थापना परिषद उत्साहात संपन्न

नागपूर :- महाराष्ट्र युवा शासन पार्टीच्या स्थापना परिषदेचे आयोजन रविभवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे 14 जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या परिषदेला मोठ्या संख्येने युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिषदेत युवकांची समाजातील भूमिका, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन व्यवस्था, सामाजिक न्याय तसेच जनहिताच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित वक्त्यांनी युवकांना राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. आनंद सर यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची गरज अधोरेखित करत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी संघटित होण्याचा संदेश दिला. युवकशक्तीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक आणि परिवर्तनशील बदल घडवून आणता येऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाच्या स्थापनेमागील उद्दिष्टे, युवक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती तसेच भविष्यातील कार्य आराखडा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. राज्यातील युवकांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पक्ष कार्यरत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांचे आभार मानून व्यक्त केला. भविष्यात जनहित, सामाजिक परिवर्तन आणि युवा सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. असे आनंद यांनी पत्रपरिषदेत सांगितले. याप्रसंगी उपस्थित कमलाकर अवचट, मंगेश वनारसे, उमेश दखणे, यांची उपस्थिती होती.

Popular Articles