कामठी :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने तालुकास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा मंगळवारी नायब तहसीलदार सारिका धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश मोटे, उपजिल्हा रुग्णालय कामठीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निशात शेख, प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तारिक अन्सारी, प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळाचे डॉ. मोहनीश तिवारी, प्राथमिक आरोग्य केंद्र भूगावचे डॉ. मनोहर ठाकरे तसेच UPHC कामठीचे डॉ. हिमांशु साखरे उपस्थित होते. याशिवाय तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारीही सभेला उपस्थित होते.
सभेत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश मोटे यांनी उपस्थितांना मोहिमेचे महत्त्व, उद्दिष्टे तसेच नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील आरोग्य सहाय्यक सोमकुवर यांनी केले.







