नागपूर :- हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १८/०६/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १३ चोरीच्या गुन्हयाची उकल केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांचे पथक उघड न झालेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर पोलीस स्टेशन, नागपूर ग्रामीण यांच्या सहकार्याने तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे तपास केला. तपासादरम्यान नागपूर ग्रामीण जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन हद्दींमध्ये गर्दीची ठिकाणे, बसस्थानके, आठवडी बाजार, लग्नसमारंभ तसेच सण-उत्सवांच्या काळात गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करणारी टोळी निष्पन्न करत एका महीला आरोपीला ताब्यात घेतले. नमुद आरोपी हीच्या कडे कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता तिने तिच्या साथीदारासह केलेल्या १३ चोरीच्या गुन्हयांची माहीती दिली. पोलीसांनी नमुद आरोपीकडुन सोन्याची लगड एकूण वजन ११६.४४ ग्रॅम किंमती ११,६४,४००/- आणि ५०,०००/- रूपये रोख रक्कम असा एकुण १२,१४,४०० /-रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.







