नागपूर :- लॉयन्स क्लब ऑफ नागपूर हेरीटेजच्या वर्ष 2026-27 या कार्यकाळासाठी नवीन संचालक मंडळाची निवड नुकतीच करण्यात आली. नव्या कार्यकारी टीममध्ये अध्यक्षपदी विजया वैंदेशकर, सचिवपदी मृदुला हेडाऊ, कोषाध्यक्षपदी स्मिता रेवतकर, उपाध्यक्षपदी अनघा वैद्य तसेच जनसंपर्क अधिकारीपदी प्रमोद हेडाऊ यांची निवड करण्यात आली आहे.
क्लबचा 20 वा पदग्रहण समारंभ रविवार, 28 जून रोजी सकाळी 10.30 वाजता पेंच येथील जंगल होम रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात प्रथम जिल्हा गव्हर्नर डॉ. अरुण चतुर्वेदी यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाला रिजन चेअरपरसन विजय पाटील, झोन चेअरपरसन डॉ. दत्तात्रय वझरकर, क्लब प्रशासक विवेक वैद्य यांच्यासह लॉयन्स क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.







