spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

घातक चाकूसह दहशत माजवणारा युवक जुन्या कामठी पोलिसांच्या जाळ्यात

– रुईंगज मैदान परिसरात नागरिकांना शिवीगाळ करत धुमाकूळ; लोखंडी चाकूसह आरोपी अटकेत

कामठी :- जुन्या कामठी पोलिसांनी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाला घातक शस्त्रासह अटक करून मोठी कारवाई केली आहे. रुईंगज मैदान परिसरात हातात धारदार लोखंडी चाकू घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करत धुमाकूळ घालणाऱ्या युवकाला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या दरम्यान जुनी कामठी पोलिसांचे पथक नियमित पेट्रोलिंग करत असताना शर्मा देशी दारू भट्टीजवळ, रुईंगज मैदान परिसरात एक युवक शस्त्र हातात घेऊन गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तेथे एक युवक हातात धारदार लोखंडी चाकू घेऊन नागरिकांना धमकावत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला वेढा घालून ताब्यात घेतले व त्याच्याकडील शस्त्र जप्त केले. चौकशीत आरोपीने आपले नाव शकील अहमद इन्तियाज अहमद (वय ३९ वर्षे), रा. चंपा आश्रमजवळ, जे.एन. रोड, रुईंगज मैदान परिसर, कामठी असे सांगितले.

आरोपीच्या ताब्यातून सुमारे २५० रुपये किंमतीचा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला. आरोपी कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगत असल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी सतर्क फिर्यादी पोलीस शिपाई मधुकर निकाळजे यांच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. सागर भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या धडक मोहिमेचे कौतुक केले जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.