spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रभाकर मनोहर शिंदे यांना ‘राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६’ जाहीर

नागपूर :- सामाजिक, शैक्षणिक व जनकल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण योगदान देणारे नागपूरचे ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर मनोहर शिंदे यांची प्रतिष्ठेच्या ‘राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६ अंतर्गत विदर्भ विभागातून हा मानाचा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.

या निवडीची अधिकृत माहिती देण्यासाठी विवेक विचार मंच, विदर्भ प्रांताचे पालक सुनील कीटकरू आणि राजू छाया साळवे यांनी प्रभाकर शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती दिली. हा पुरस्कार येत्या २८ जून रोजी, महाड (जिल्हा रायगड) येथे आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी विवेक विचार मंचच्या वतीने प्रभाकर शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सामाजिक न्याय, शिक्षण आणि जनहिताच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. प्रभाकर शिंदे यांच्या या गौरवपूर्ण निवडीमुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भातील सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार त्यांच्या दीर्घकालीन समाजसेवेचा सन्मान मानला जात आहे.

Popular Articles