spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाघधरे वाडी कन्हान येथे घरफोडी

– सोन्या, चांदीचे दागिने व नगदी २० हजार असा एकुण ४६५०० रू. ची घरफोडी

कन्हान :- शहरातील वाघधरे वाडी येथिल अमर शेंडे हे बाहेर गावी गेल्याने त्याच्या घरी कुणी नसल्याची संधी साधुन अज्ञात चोरानी दाराचे कुलुप तोडुन घरफोडी करित आलमारीतील सोन्या, चांदीचे दागिने व नगदी वीस हजार असा एकुण छेचाळीस हजार पाचशे रूपयाचा मुद्देमाल चोरून पसार झाले.

अमर हेमंत शेंडे वय ४० वर्षे रा. वाघधरे वाडी कन्हान ता. पारशिवनी हे आपल्या परिवारासह घराच्या दाराला कुलुप लावुन मंगळवार (दि.१६) जुन ला सकाळी सासरी मुंडीकोटा ता. तुमसर ला गेले होते. शनिवार (दि.२०) जुन ला सकाळी ७ वाजता घरा शेजारी राहणार शक्ती गायकवाड हयांनी फोन करून सांगितले की. तुझ्या घराच्या दाराचे कुलुप तुटले असुन चोरी झाली आहे. यावरून अमर शेंडे हे परिवारासह वाघधरे वाडी येथिल घरी सकाळी ९.३० वाजता येऊन पाहिले तर घराच्या दाराचे कुलुप तुटले असुन आतील दाराचा दरवाजाचे कुंडी लागलेला भाग तुटलेला होता म्हणुन आत जावुन पाहिले असता किचन रुम मधिल लोखंडी गोदरेज आलमारी खुली असुन त्यातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले. आलमारीत ठेवलेले नगदी २०,००० रु., जुने वापरते कानातील सोन्याचे कुंडल १.५ ग्रॅम कि. १०,००० रु. सोन्याचे कानातील बोंगली व कुडका अंदाजे ०२ ग्रॅम किं. अं. १५,००० रु. व चांदीची कडी २० ग्रॅम किं.अं. १५०० रु. हे दिसले नाही तेव्हा समजले कि, घरी कोणीतरी अज्ञात चोरानी घरफोडी करून सोन्या, चांदीचे दागिने २६५०० रू. व नगदी २० हजार असा एकुण ४६५०० रू. चा मुद्देमाल चोरी करून पसार झाल्याने अमर शेंडे यानी कन्हान पोलीस स्टेशन गाठुन कोणीतरी अज्ञात चोराने घराचे दाराचे कुलूप तोडुन घरातील आलमारीतील सोन्याचे व चांदीचे दागिणे व नगदी असा एकुण ४६५०० रू.चा मुद्देमाल चोरुन नेल्याची तक्रार दिल्याने कन्हान पोली स निरिक्षक वैजंयती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीसानी अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपींचा शोध घेत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.