spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आंतरराष्ट्रीय योग दिवस भाजपा चाचेर मंडळ च्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये संपन्न 

किशोर साहू, मौदा :- रविवार (ता.21 जून )ला भारतीय जनता पार्टी चाचेर मंडळाच्या वतीने चाचेर येथील रुक्मिणी सेलिब्रेशन लॉन इथे शारीरिक दृष्ट्या कार्यकर्ता सुखी ,समृद्ध, आरोग्यदायी असावा म्हणून या देशाचे युग पुरुष, विकास पुरुष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्पनातून योग दिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

आजच्या धकाधकीच्या युगात जनतेला निरोगी राहण्याकरिता योगा करणे काळाची गरज आहे. योगा केले तर शारीरिकदृष्ट्या निरोगी राहू शकतो हेच ध्येय ठेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन चाचेर मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजक माजी उपसभापती खेमराज चाफले व सरपंच, गांगनेर उपकेंद्र आरोग्य सभापती तथा जिल्हा किसान आघाडी महामंत्री संकेत झाडे यांनी केले.

या कार्यक्रमाला भाजपा मौदा तालुका चाचेर मंडळ अध्यक्ष रवींद्र चव्हाण , चाचेर मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष मंगेश चाफले, अशोक बावनकुळे,महेंद्र दोरखंडे, दत्तू रंगारी,रामा मते, सुरेश भिलकर,मेघशाम कुलरकार,सिंन्नू भैय्या,किरण बरबटे,उमेश शेंडे सह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजक सरपंच संकेत झाडे यांनी सर्वांचे आभार मानले व याप्रसंगी कुटुंबासह सर्वांनी योगा करा, निरोगी रहा, असा सल्ला दिला.

Popular Articles