spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पीएम श्री उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे रविवार (ता. 21 जून )ला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. दररोज योग, व्यायाम का करण्यात यावे? आणि ते आपल्या शरीरासाठी कसे उपयुक्त आहे याची सर्व माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. व्यायामामुळे आपले शरीर सुदृढ आणि निकोप बनते.

कार्यक्रमाप्रसंगी सुधीर खंडाईत यांनी विद्यार्थ्यांना सुरुवातीला मुक्त हालचाली, सुर्यनमस्कार, विविध प्रकारची योगासने विद्यार्थ्यांना करून दाखवली .त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुद्धा सर्व योगासने केली.या कार्यक्रमानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रणधीर आंबीलढुके, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर खंडाईत,सुधीर कांबळे , राजेश रोहाड , सुजाता बोदेले ,प्रज्ञा रामटेके , उमेश उके,पुष्पलता उके, कैलास फटिंग, यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक सुधीर कांबळे यांनी केले.

Popular Articles