spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

किशोर साहू, मौदा :- आयुर्वेदिक दवाखाना व उपकेंद्र चाचेर तसेच पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चाचेर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार(ता .२१ जून) ला आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांसाठी योगासनांचे प्रात्यक्षिक व सामूहिक योगाभ्यास आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर करून योगाचे महत्त्व पटवून दिले. तसेच यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या योगासन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत चाचेरच्या सरपंच लुंबिनी महेश कलारे उपस्थित होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मानसी गायकवाड , डॉ तक्षशिला मेश्राम व योगा शिक्षक पौर्णिमा कावळे यांनी योगाचे आरोग्यदायी फायदे व नियमित योगाभ्यासाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवन सहारे, उपाध्यक्ष अमिता वैद्य, मुख्याध्यापक अनिल गडपायले, सर्व शिक्षकवृंद, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक विनोद लांडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत चाचेर यांनी सहकार्य केले.

Popular Articles