spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ऑपरेशन यू टर्न माध्यमातून जनजागृती, वाहतूक नियमांचे पालन करा, अपघाताला बळी पडू नका. – आय पी एस लोहित मतानी

खापा, वार्ताहर :- नागपूर परिक्षेत्रात रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाने कंबर कसली आहे. महामार्गावर होणाऱ्या दुर्घटना, वाढते अपघात, वाहतूक नियमांचे पालन करून कमी करण्याच्या दृष्टीने महामार्ग पोलीस अधीक्षक (प्रादेशिक विभाग नागपूर) लोहित मतानी यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन यू टर्नच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

यानिमित्ताने राष्ट्रीय महामार्ग ७५३ सावनेर पारशिवनी आंबडी महामार्गावरील खापा पोलिस स्टेशन अंतर्गत वनविभाग नाक्याजवळील महामार्गावरील टी पॉइंटवर पाटणसावंगी महामार्ग पोलीस मदत केंद्र यांच्या वतीने नाकाबंदी आणि वाहतूक नियम अंमलबजावणी सत्र सोमवार दि. २२ जून रोजी अत्यंत प्रभावीपणे जनजागृती अभियान राबविण्यात आला.

हेल्मेट घालून प्रवास करणे, दारू अथवा कसल्याही प्रकारे व्यसन करून प्रवास टाळणे, वाहन भरधाव गतीवर नियंत्रण, धोकादायक पार्किंग, सीट बेल्ट लावणे, वाहतूक नियमांचे पालन करून अपघाताचे प्रमाण कमी व्हावे हे या ऑपरेशन यू टर्नचे मुख्य उद्देश आहे. महामार्ग प्रादेशिक पोलीस अधीक्षक (वाहतूक)(आय पी एस) लोहित मतानी, उपविभागीय पोलिस अधिकारी (वाहतूक) नरेंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पाटणसावंगी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक दिपक धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई अंकुश शास्त्री, सुरेश निंबाळकर, अंकित ठाकरे, रंजन कांबळे, राहुल ताभणे, महिला पोलीस शिपाई बाली जाधव तसेच पोलीस पाटील, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने प्रभावीपणे राबविण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.