spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अजय बिवडे यांना ‘अजेय लेखणी सन्मान पुरस्कार-२०२६’ जाहीर

– १२ जुलै रोजी मुंबईत पुरस्काराने होणार सन्मानित

नागपूर :- पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत सिंहवाणी वृत्त या नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या दैनिकाचे मुख्य संपादक अजय बिवडे यांची प्रतिष्ठेच्या ‘अजेय लेखणी सन्मान पुरस्कार-२०२६’साठी निवड करण्यात आली आहे. गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या अजय बिवडे यांनी विविध वृत्तपत्रांमधून समाजाभिमुख पत्रकारिता करत आपला वेगळा ठसा उमटविला आहे. ते भारत सरकारमान्य पीआरजीआय प्रेस असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असून, दैनिक शिवघोषचे संपादक म्हणूनही कार्यरत आहेत. आर्यारवी एन्टरटेन्मेंट, मुंबईतर्फे दरवर्षी महाराष्ट्रातील पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, साहित्यिक, कलावंत आणि समाजसेवक यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात येतो. त्याच परंपरेनुसार यंदाही विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुंबई येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात अजय बिवडे यांना ‘अजेय लेखणी सन्मान पुरस्कार-२०२६’ प्रदान करण्यात येणार आहे. या निवडीबद्दल आर्यारवी एन्टरटेन्मेंटचे आयोजक महेश्वर तेटांबे तसेच समन्वयक गुरूनाथ तिरपणकर यांनी अजय बिवडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा हा सन्मान असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.

Popular Articles