spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एकल महिला दिवस साजरा

नागपूर :- मंत्री, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या निर्देशान्वये नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे झोन क्र. 1 ते 10 अंतर्गत दिनांक 23/06/2026 रोजी आंतरराष्ट्रीय “एकल महिला दिवस” साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमा अंतर्गत एकल महिलांच्या समस्या, अडचणी तसेच शासनाकडून अपेक्षित उपाययोजनांबाबत चर्चा आयोजित करण्यात आली, त्यांनी उभारलेल्या यशस्वी उपक्रमांची माहिती देऊन त्यांचा सत्कार/प्रेरणादायी संवाद आयोजित करण्यात आला, बचत गटामध्ये नसलेल्या महिलांना बचत गटांशी जुडण्याबाबत प्रेरित करण्यात आले, स्त्री-पुरुष समानता, सन्मान व सामाजिक प्रतिष्ठा याबाबत जनजागृती करण्यात आली, सन्मान व हक्क, शिक्षण व कौशल्य विकास, आर्थिक स्वावलंबन व रोजगार, कायदेशीर मदत व शासकीय योजना, मानसिक आजार व समाजातील सहभाग याबाबत माहिती देण्यात आली. तसेच एकल महिलांच्या समस्या, सूचना व मागण्या नोंदवून त्यांचे संकलन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला मनपा झोन क्र. 1 ते 10 चे सभापती, नगर सेवक / नगरसेविका, उपायुक्त (समाज विकास विभाग) डॉ. रंजना लाडे, सहा. आयुक्त, विधी सल्लागार रविंद नकुले, सारंग गजभिये, कीर्ती नांदे, पोलीस सायबर सेलचे PSI नेहा गुंडरे, कॉन्स्टेबल आकांक्षा सिंग, गजानन मोरे, जितेंद्र पहाडे, अॅडव्होकेट मोनाली गांधी, DAY-NULM चे शहर अभियान व्यवस्थापक, सर्व झोनचे समुदाय संघटक व समुपदेशन केंद्र संचालन संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच 10 झोन अंतर्गत 556 महिला उपस्थित होते. याप्रमाणे आंतरराष्ट्रीय “एकल महिला दिवस” महानगरपालिकेच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.

Popular Articles