spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपात ४ ऑगस्ट रोजी लोकशाही दिन

 

 नागपूर ता ३० : महाराष्ट्र शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार ४ ऑगस्ट  रोजी सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात ‘लोकशाही दिन’ चे आयोजित करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचे मनपात होणाऱ्या लोकशाही दिनात निकाली काढल्या जातील. लोकशाही दिनाला सर्व कक्ष प्रमुख व दहाही झोनच्या सर्व सहायक आयुक्तांनी माहितीसह उपस्थित राहावे, असे निर्देश नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Popular Articles