किशोर साहू: मौदा, ता. ३०: ग्रामपंचायत येसंबा येथे आज मंगळवार (दि. २९ जुलै) ला नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या पूजेसह झाडांची पूजा करून ‘ एक पेड मा के नाम’ ही मोहीम राबवून गावातील महिलांना आंबा या प्रजातीचे फळझाडांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंचा सोनु इरपाते, उपसरपंच धनराज हारोडे, ग्रामसाचिव विनोद तागडे, ग्रा.प. सदस्यगण करिशमा पानतावणे, रेवती डदुरे, देवानंद गजभिये, वर्षा महाले , ग्रामपंचायत कर्मचारी संजय गजभिये व ग्रामस्थ उपस्थित होते.
नागदेवतेच्या पूजेसह झाडाची पूजा करून येसंबा येथे ‘एक पेड मा के नाम ‘अंतर्गत महिलांना फळझाडांचे वाटप








