उमेश भेलकर, मोहपा :- लग्न म्हणजे काय?तसं लग्न म्हणजे दोन जिवांचा मेळ,दोन भावनांचं बंधन, अन दोन मनांचं मिलन.सुख-दुःखाच्या वाटेवर, चालण्याची एक नवीन रीत,ज्यात जोडली जाते कायमची एक अनोखी प्रीत.
प्रत्येक समाजात आज काल लग्न जुळणे फार कठीण झाले आहे. याला कारण काय तर मुलींच्या वाढत्या अपेक्षा आणि मोबाईल. पूर्वी जेष्ठ नागरिकांच्या मध्यस्तीने लग्न जुळायचे. पण आता वेळ परिस्थिती बदलली आहे. आई वडिलांना मुलगा पसंत असतो तर मुलगी नाही म्हणते. मुलीची पसंती असते तर आई वडील यांचा नकार असतो.
अपेक्षेत वाढ पुणे वाला इंजिनियर हवा. सरकारी नोकरी सोबत शेती असावी. एकटाच असावा गाडी बंगला असावा.संयुक्त कुटुंब (एकत्र कुटुंब पद्धत) नको.
प्रेमविवाह वेळी अपेक्षेत विसर प्रेम विवाह करताना मुलींना अपेक्षा नको त्यांना शेती नको त्यांना सरकारी नोकरी नको इंजिनियर नको.
मुलांचे जीवन स्वतःचे शिक्षण पूर्ण करून त्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करणे, बघता बघता मुलांची वयाची 30 वर्ष पूर्ण होऊन जातात. लग्नाला निघताना मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहणे अनिवार्य आहे. कारण त्यांना समोर एक कुटुंब चालवावे लागते. म्हणूनच कदाचित मुलांचं वाढतं वय हे सुद्धा एक कारणीभूत आहे. वाढत्या घटस्फोटाची कारणे सध्याच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण वाढण्यामागे प्रामुख्याने विवाहबाह्य संबंध, आर्थिक वाद, कौटुंबिक हिंसाचार किंवा क्रूरता, परस्पर संवादाचा अभाव, आणि महिलांचे आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य ही प्रमुख कारणे आहेत.
शेती पाहिजे पण शेती वाला मुलगा नको आज कालच्या शिक्षित मुलींना शेतकरी नवरा नको पण शेती हवी. मग शेती का हवी? तर उत्तर येते भविष्यात जर मुलाला काही झालं तर त्या शेतीचा आधार आमच्या मुलींना मिळेल. आज कालच्या आई-वडिलांची हे विचार समाजासाठी मात्र घातक ठरत आहे.
मुलींचे जिवन हा अतिशय हळुवार, जबाबदाऱ्यांनी भरलेला आणि तरीही विविध भूमिकांतून बहरत जाणारा प्रवास आहे. बालपणातील लाड, शिक्षणातून मिळणारे पंख, आणि स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबाला व समाजाला दिलेली ऊर्जा, हे मुलींच्या आयुष्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.विवाह आणि नवीन कुटुंब लग्नानंतर मुलीला एका नवीन वातावरणात जुळवून घ्यावे लागते. माहेरच्या सवयी मागे सोडून सासरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना तिचा कस लागतो.
मुलांचे स्वप्न
वय झालं तरी अजून
जमत नाही लग्न!
त्यात पोरींच्या अपेक्षांनी
आडवं येतय विघ्न!!
काय तर म्हणे …….
“व्यावसायिक नको
नोकरीवाला पाहिजे!
पगार त्याचा
सरकारी पाहिजे!
काळा नको
गोरा गोरापान हवा
सगळ्या बाबतीत
कोरा हवा!!




