spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोहप्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम साजरी

उमेश भेलकर, मोहपा :- एकही मूल सुटू नये, पोलिओचे थेंब घेण्यापासून कुणीही थांबू नये., २८ जून रोजी राज्यभर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजले जात आहेत। बालकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हे डोस अत्यंत महत्त्वाचे आहेत.

मोहपा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे तर्फे एकूण पाच पोलिओ बूथ ठेवण्यात आले.

मोहपा- मेन बस स्टॉप, कन्या शाळा मोहपा, हनुमान मंदिर मोहपा, माता मंदिर मोहपा, वार्ड क्रमांक 03 गळबर्डी बस स्टॉप.

रवि‍वारचा दिवस छान,बाळ हसते सारे भान,घेऊन जाऊया बूथवर आज,मिळेल आरोग्याचे मोठे काज. दोन थेंब बालकाच्या ओठी,आरोग्याची सुंदर गोड मिठी,पोलिओचा होईल नाश,उजळेल बाळपणाची आशा.पाच वर्षांपर्यंतच्या बाळाला,विसरू नका पाजायला या थेंबाला,देश आपला पोलिओमुक्त करू, चला, सुजाण पालकत्व सिद्ध करू!

Popular Articles