spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिव्यांग कल्याणासाठी नगर परिषद कामठीचा पुढाकार; 417 लाभार्थ्यांना ₹8.34 लाखांचे अर्थसहाय्य

कामठी :- नगर परिषद कामठीच्या वतीने दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत आयोजित कार्यक्रमात शहरातील 417 दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण ₹8 लाख 34 हजारांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले. नगर परिषद कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी सांगितले की, दिव्यांग नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविणे, त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाला नगर परिषद उपाध्यक्ष परवीन खान, उपमुख्याधिकारी रत्नमाला फाटिंग तसेच वरिष्ठ लिपिक मधुरू घोडेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

प्रकल्प अधिकारी प्रदीप तांबे यांनी सांगितले की, या आर्थिक सहाय्यामुळे दिव्यांग नागरिकांना आर्थिक बळ मिळून त्यांचे जीवन अधिक सन्मानाने, आत्मविश्वासाने आणि स्वावलंबीपणे जगण्यास मदत होईल.

नगर परिषद कामठीच्या या उपक्रमाचे लाभार्थी व नागरिकांकडून स्वागत करण्यात आले असून, दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी गरजेची असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Popular Articles