spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आज रानभाजी महोत्सवाचे आयोजन

 

नागपूर, दि. ३० :  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपूरच्या वतीने केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2025-26 मध्ये आदिवासी भागातील रानभाजी, रानफळे, वनऔषधे तसेच अन्नधान्य आणि आदिवासी बांधवांच्या शबरी नॅचरल बॉन्डच्या प्रिमीयम उत्पादनांची विक्री करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी रानभाजी महोत्सवाचे कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, आदिवासी विकास भवन नागपूर, अमरावती रोड, गिरीपेठ, येथे बुधवार, दिनांक 30 जुलै दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत करण्यात येत असल्याचे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूर यांनी कळविले येत आहे.

आदिवासी भागामध्ये पावसाळ्यामध्ये विशेषतः आदिवासी पट्टयांमध्ये उपलब्ध असलेल्या पारंपारिक रानभाज्या एकत्र करुन, तसेच शहरी भागातील लोकांना रानभाज्यांचे आयुर्वेदिक व त्यामध्ये उपलब्ध असलेली पोषणमुल्ये यांचे महत्व पटवून देणेसाठी त्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत पावसाळयामध्ये रानभाज्या/रानफळे उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच रानभाज्या / रानफळांसाठी अल्प कालावधी असल्याने, “रानभाजी महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन करुन, लाभार्थ्यांसाठी स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

तसेच या कार्यालयाअंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेसाठी सन 2025-26  या आर्थिक वर्षामध्ये “रानभाजी महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरीता नागपूर कार्यक्षेत्राअंतर्गत येणारे तालुका व प्रमुख गावातील बाजारपेठे, मोक्याच्या ठिकाणी सामुहिक स्वरुपात लाभार्थ्यांच्या उपलब्ध रानभाजी व इतर भाजीपाला प्रमाणे आठवड्यातील ठरावीक दिवसानु‌सार रानभाजी महोत्सव आयोजन करणे व रानभाज्यांना सार्वजनिक प्रसिध्दी करण्याच्या दृष्टीकोनातून आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.