spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आता जि प शाळेत मोफतच नव्हे तर गुणवत्ता पूर्ण शिक्षण: मुख्याध्यापिका पठाण तब्बसूम

किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोवरी येथे मंगळवार (ता. 30 जून) ला शाळा प्रवेशोत्सव, नवगतांचे स्वागत, गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांचे म्हणजेच नवागतांचे बैलबंडीतून मिरवणूक काढून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.

आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेवर विश्वास ठेवा, आज या शाळेमधून मोफत पाठ्यपुस्तक, अनुभवी शिक्षक तसेच विविध उपक्रम घेतले जात आहेत म्हणजेच आता जि प शाळेतून मोफतच नव्हे तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येत आहे असे याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका पठाण तब्बसूम अयुबखान यांनी सांगितले.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश निरगुळकर, उपाध्यक्ष प्रल्हाद वैद्य तसेच ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ गिर्हेपुंजे, रामप्रसाद देशमुख,मिथुन जाधव, योगिता निरगुळकर, निकिता वैद्य, ज्योती वैद्य, सविता गिर्हेपुंजे, सरोज गिर्हेपुंजे, कृषिताई रुपाली गिर्हेपुंजे, अंगणवाडी सेविका ज्योति वाडीभस्मे , स्वयंपाकी शोभा बावणे इतर पालक वर्ग उपस्थित होते.

Popular Articles