किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे सन 2026 -27 या शैक्षणिक वर्षात प्रवेशोत्सव चा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी सुरवातीला विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना प्रभात फेरीमध्ये समाविष्ट करण्यात आले.
दाखल पात्र विद्यार्थ्यांना छान सुसोभित करून पहिल्या वर्गाची टोपी त्यांना परिधान करण्यात आली. मुख्याध्यापक वासुदेव भुते , गट ग्रामपंचायत दहेगाव चे सरपंचा भारती संदीप आंबिलढुके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे यांनी दाखल पात्र विद्यार्थीचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. शाळेत प्रवास दिंडी आल्यानंतर शाळेत प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या दोन्ही पायाचे ठसे घेण्यात आले. विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन कुंकुम तिलक करून स्वागत करण्यात आले.
यानंतर शाळा प्रवेशोत्सव मेळावा 2 घेण्यात आला. या मेळाव्याचे अध्यक्ष गट ग्रामपंचायत दहेगाव चे सरपंचा भारती संदीप आंबिलढुके,प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे,प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रणधीर आंबिलढुके, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बादल आंबिलढुके , महिला प्रतिष्ठित गौरा मेहर ,गट ग्रामपंचायतच्या सदस्या छबु घडोले , शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सुनंदा हटवार उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य, सदस्या उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात शाळाप्रवेशोत्सव घेण्यामागची कारणे काय?या मागचा उद्देश काय?हे विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षा भारती संदीप आंबिलढुके यानी आपले अध्यक्षीय भाषणात पहिल्या वर्गात दाखल पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि नवीन शैक्षणिक सत्र 2026 -27 या सत्रासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सुधीर खंडाईत यांनी केले यांनी केले. शाळा प्रवोशोत्स्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद राजेश रोहाड,सुधीर कांबळे , सुजाता बोदेले, प्रज्ञा रामटेके, उमेश उके, पुष्पलता उके, कैलास फटिंग यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका सुजाता बोदेले यांनी केले. या दिवशी विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आला. अशाप्रकारे विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आनंदमय वातावरणात घालवण्यात आला.








