spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एम्पथी फाउंडेशन मुंबई तर्फे पीएम श्री जि. प. उच्च प्राथमिक शाळा चाचेर येथे सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वाटप 

किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जि. प. उच्च प्राथमिक शाळा, चाचेर येथे मंगळवार( ता. 30 जून) ला शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल देऊन तसेच पायांचे ठसे घेऊन जंगी स्वागत करून करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या सहभागातून गावामध्ये प्रवेशोत्सव दिंडी काढण्यात आली.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवन सहारे, उपसरपंच रविंद्र ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र टेंभरे, योगेश्वर निनावे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा अमिता वैद्य तसेच किरण बरबटे, प्रफुल्ल बादोले, रामकृष्णा आंबिलढुके , सुनिल राऊत , एकनाथ टेंभरे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर नाकाडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे व डॉ. दिनेश बादोले या सर्व मान्यवरांचा हस्ते पाटपुस्तक वाटप करण्यात आले व एम्पथी फाउंडेशन मुंबई यांच्या चा कडून सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे मोफत वाटप करण्यात आले .

कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक अनिल गडपायले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शिक्षक रविंद्र घुगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षिका साखरकर, बालकोटे, खंगार, उकुड्डे,शेख, खंडाईत व निमजे यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासोबत जलेबीचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Popular Articles