spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाट्रान्सकोच्या सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदावर कामठीच्या प्रज्ञाली गायगोले यांची दैदिप्यमान निवड

– जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या बळावर मिळविले यश

कामठी :- महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी (महाट्रान्सको) यांच्या २२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत कामठीच्या प्रज्ञाली प्रदीप गायगोले यांनी उल्लेखनीय यश मिळवत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – Assistant Engineer (Civil) या प्रतिष्ठित पदावर निवड मिळविली आहे.

प्रज्ञाली या पंचायत समिती , कामठी येथील सेवानिवृत्त गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले यांच्या कन्या आहेत. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या प्रज्ञाली यांनी सातत्यपूर्ण मेहनत, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर त्या सध्या विशेष इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. येथे सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. नोकरी सांभाळत स्पर्धा परीक्षेची केलेली शिस्तबद्ध तयारी अखेर यशस्वी ठरली आणि त्यांना महाट्रान्सकोसारख्या प्रतिष्ठित शासकीय संस्थेत अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

प्रज्ञाली यांच्या या यशामुळे गायगोले कुटुंबाचा तसेच संपूर्ण कामठी शहराचा गौरव झाला असून, त्यांच्या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरत असून, जिद्द, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.

Popular Articles