spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संत गुलाबराव महाराज यांना जयंतीदिनी दिल्लीत अभिवादन

नवी दिल्ली :- वेद, शास्त्र आणि भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक, ज्ञानेशकन्या, प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांना आज येथे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल यांनी राष्ट्रसंत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांनी संत गुलाबराव महाराज यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानाचा परिचय करून दिला.

Popular Articles