नागपूर :- बाल विकासाच्या क्षेत्रात 40 वर्षा पासून अनाथ व निराधार बालकांकरीता निस्वार्थ कार्य करणाऱ्या शिवशंकर सेलोकर यांच्या कार्याचा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी साविस्तर परिचय करून दिला. ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन च्या वतीने यांना प्रशस्ती पत्र देउन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन च्या चेअरमन डॉ मनीषा ठाकरे व इतर मान्यवर उपस्थित होते. सेलोकर यांचे गरजू बालकांकरिता सरकारची कोणतीही मदत न घेता हे कार्य इंडियन चिल्ड्रेन वेल्फेअर ट्रस्ट च्या माध्यमातून निरंतर सुरू आहे. बाल संगोपन योजना, कायदेशिर दत्तक प्रक्रिया याकरिता निःशुल्क सल्ला व मार्गदर्शन यांच्या तर्फे करण्यात येत आहे सेलोकर सध्या बाल कल्याण समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
बाल संरक्षण क्षेत्रात विशेष कार्य: निराधार बालकांच्या सेवेसाठी सेलोकार यांचा सत्कार









