spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पावसळ्यात विविध विभागांनी समन्वयाने कार्य करावे – महापौर निता ठाकरे

– महापौरांनी घेतली लक्ष्मीनगर झोन व धंतोली झोनच्या नगरसेवक,अधिकाऱ्यांची बैठक

नागपूर :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर निता ठाकरे यांनी सोमवार (ता 6) रोजी लक्ष्मीनगर झोन आणि धरमपेठ झोन कार्यालयात बैठक घेऊन नगरसेवकांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी नाले सफाई, रस्त्यांची स्थिती, पावसाच्या पाण्याचा निचरा वेळेवर करण्यासाठी संबंधित झोन कार्यालयाची यंत्रणा तयार ठेवण्याचे निर्देश दिले. महापौर ठाकरे यांनी पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच विविध विभागांमध्ये समन्वय राखून, सुरू असलेले विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

नागपूर शहरातील अवैध बांधकाम, पाणी पुरवठा, अतिक्रमण, नालेसफाई आणि सिव्हर लाईन चोकेज आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयात झालेल्या प्रभाग क्रमांक,१६,३६,३७,३८ च्या बैठकीत मनपाच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांच्यासह लक्ष्मीनगर झोन सभापती तारा (लक्ष्मी) यादव, आरोग्य समिती सभापती मनिषा अतकरे, स्थापना व प्रकल्प विशेष समिती सभापती अश्विनी जिचकार, विधी विशेष समिती सभापती निधी तेलगोटे, नगरसेवक सर्वश्री दिलीप दिवे, रितेश गावंडे, अमोल शामकुळे, सुनील दांडेकर नगरसेविका वर्षा चौधरी,  माया हाडे, कुमुदिनी गुडधे, ईश्वर ढेंगळे, संजय उगले, शैलेन्द्र डोरले, माहेश्वरी पटले लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त धनंजय जाधव, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याशिवाय धरमपेठ झोन कार्यालयात झालेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती  शिवानी दाणी वखरे यांच्यासह, धरमपेठ झोन सभापती धनश्री देशपांडे, गलिच्छ वस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समिती सभापती रुतिका मसराम, आरोग्य समिती सभापती मनिषा अतकरे, नगरसेविका साधना बरडे, वर्षा चौधरी, पुजा पाठक,  योगिता तेलंग, नगरसेवक विनय दाणी विक्रम ग्वालबंशी, योगेश पाचपोर, केतन ठाकरे, अभिजीत झा, सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंत मनोज गद्रे, श्रीकांत वाईकर उपस्थित होते.

बैठकीत सर्वप्रथम उद्यान विभाग, पाणी पुरवठा, आरोग्य, पथदीप आणि इतर विषयांवर महापौर निता ठाकरे यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर आणि वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच मटण मार्केटसह इतर सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर कडक कारवाई करून संबंधितांचे साहित्य जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले.

लक्ष्मीनगर झोन समिती सभापती लक्ष्मी यादव यांनी नालेसफाईच्या कामात नगरसेवकांच्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देश दिले. नाल्याची सफाई केल्यानंतर गलिच्छ कचरा नाल्याच्या बाजूलाच अनेक दिवस पडून राहतो, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली. बैठकीदरम्यान झोन सभापती धनश्री देशपांडे यांनी नाले सफाई, गडर लाईन चोकेज आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला. तसेच अंबाझरी तलावात येत असलेल्या एमआयडीसीतील घाण पाण्याबाबत चर्चा केली.

Popular Articles