– संघटन विस्तार, आगामी कार्यक्रमांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा
कामठी :- जयस्तंभ चौक कामठी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भाजप कामठी शहर संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक शहराध्यक्ष मंगेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
बैठकीत संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आगामी कार्यक्रमांचे नियोजन, संघटन विस्तार, बूथस्तरावरील पक्षबांधणी तसेच विविध समकालीन विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग नोंदवून आगामी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन शहराध्यक्ष मंगेश यादव यांनी केले.
यावेळी लालसिंग यादव, कमलकिशोर यादव, राजकुमार हाडोती, लालाजी खंडेलवाल, दिलीप बांडेबूचे, विजय कोंडूलवार, जयराम मेहुरकुडे, उज्वल रायबोले, प्रीतम यादव, नितीन रावेकर, रोहित तरारे, धीरज सोलंकी, अजय श्रीवास, नरेश खोकरे, देवानंद देशमुख, दिनेश शरण, रोहित तोहणे, हर्षल लिंबाचिया, लक्ष्मीकांत रंगारी, अब्लिश यादव, संध्या रायबोले, प्रेमलता शर्मा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




