spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

– दक्षिण-पश्चिम व पश्चिम नागपुरातील आठ स्कॅनिंग कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची तपासणी; ९ जुलै रोजी सहा ठिकाणी शिबिरे

नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराअंतर्गत दक्षिण-पश्चिम नागपूर व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या स्कॅनिंग कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांच्या संयोजनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमातून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच पुढील उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

आज दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील समाजभवन, बुद्धविहार (गुजरवाडी), बालाजी सभागृह (सुयोग नगर), रेणुका मंदिर (रेणुका नगर, टाकळी सीम) आणि कांजी हाऊस (सोमलवाडा) तसेच पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील दुर्गा माता मंदिर (छावणी), संत गाडगे महाराज कम्युनिटी हॉल (मानकापूर) आणि हनुमान मंदिर (गोकुळपेठ) येथे स्कॅनिंग कॅम्प पार पडले. विविध आजारांच्या तपासणीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला.

स्कॅनिंग कॅम्पमध्ये तपासणी झालेल्या आणि पुढील उपचार तसेच शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांना अधिक सखोल निदानासाठी गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर येथे पाठविण्यात आले. महाआरोग्य शिबिराचे संयोजक माजी आमदार संदीप जोशी यांनी डायग्नोस्टिक सेंटरला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस केली तसेच तपासण्या सुरळीतपणे सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

महाआरोग्य शिबिराअंतर्गत ९ जुलै रोजी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील विजय चुटेले यांचे कार्यालय (आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, इमामवाडा), रेल्वे इन्स्टिट्यूट (अजनी रेल्वे कॉलनी), दत्त मंदिर (आय. टी. पार्क रोड, संभाजी नगर) आणि सिंधू भवन, सिंधी कॉलनी (खामला) तसेच पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील दशरथ नगर समाज भवन (बोरगाव) आणि डिग दवाखाना (धरमपेठ) येथे स्कॅनिंग कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.

या मोफत आरोग्य उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी, सहसंयोजक रितेश गावंडे, विनोद कन्हेरे आणि रितेश पांडे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.