spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संजीवनी नगर परिसरातील विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी

– कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

कन्हान :- कांद्री नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक १७ मधील संजीवनी नगर परिसरात विविध समस्या निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी सचिन गाढवे आणि नगराध्यक्ष सुजित पानतावणे यांना निवेदन देऊन तातडीने समस्या सोडविण्याची मागणी केली आहे .

संजीवनी नगर परिसरातील गंगाराम शेंडे यांच्या घरामागे तसेच विनोद कोराते, मनोज बुंदेलिया, अर्चना तांडेकर आणि इतर रहिवाशी यांच्या घरा शेजारी मोठ या प्रमाणात पाणी साचुन राहत आहे. त्यामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असुन नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढुन मलेरिया, डेंग्यु, चिकनगुनिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या शिवाय परिसरात डुकरांचा व डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असुन अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्या वर विपरीत परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी झाडे झुडपे वाढल्याने साप, विंचु, अजगर यांसारखे सरपटणारे व विषारी प्राणी रहिवाशांच्या घरांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असुन तातडीने उपा ययोजना करणे आवश्यक आहे. तसेच अर्चना तांडेकर , गंगाराम शेंडे व विनोद कोराते यांच्या घराजवळील परिसरात पुरेशा पथदिव्यांची (स्ट्रीट लाईट) व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असुन अनुचित घटनांची शक्यता वाढली आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने कांद्री नगरपंचायत मुख्याधिकारी सचिन गाढवे, नगराध्यक्ष सुजित पानतावणे, नगरसेवक राकेश लांजेवार यांनी संजीवनी नगर परिसरातील समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, स्वच्छता मोहीम राबविणे, झाडेझुडपे हटविणे, डास व डुकरांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ पथ दिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी कन्हान शहर विकास मंचच्या पदाधिकार्यांनी महिला सदस्य अर्चना तांडेकर यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी सचिन गाढवे आणि नगराध्यक्ष सुजित पानतावणे यांना निवेदन देऊन केली आहे . याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक नारायण गजभिये, प्रमोद गिऱ्हे, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे, मृणाल सरोजकर, शुभम बावनकर, आयुष संतापे, मीना गिऱ्हे , जयश्री गडपाडे सह नागरिक उपस्थित होते.

Popular Articles