spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कांद्री ला १ किलो २० ग्रॅम गांजासह तिघांना अटक

– मारुती कार, तीन मोबाईलसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

कन्हान :- पोलिसांनी अमली पदार्थां विरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत कांद्री शिवारात १ किलो २० ग्रॅम गांजासह तिघांना अटक केली. कारवाईत गांजा, मारुती कार आणि तीन मोबाईल असा एकुण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे .

शनिवार (दि. ११) जुलै ला पहाटे ५.३० वाजता सुमारास कन्हान पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्या नंतर कांद्री शिवारातील नागपुर–जबलपुर महामार्गवरून गजानन नगरकडे जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. संशयित एमएच-३०-एफ-०५७५ क्रमांकाची मारुती कार अडवुन तपासणी केली असता डॅशबोर्ड मध्ये लपवुन ठेवलेला १ किलो २० ग्रॅम गांजा आढळुन आला. या प्रकरणी पोलिसांनी समीर शिवप्र काश कश्यप (२२), हर्ष उमाशंकर निषाद (१९) आणि हर्ष ओमप्रकाश कश्यप (२३), सर्व रा. खदान नं. ३ यांना ताब्यात घेतले. आरोपींकडुन ६० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, ७० हजार रुपये किमतीची मारुती ८०० कार आणि २० हजार रुपये किमतीचा गांजा असा एकुण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमा ल जप्त करण्यात आला. सरकारतर्फे फिर्यादी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक रिना मिसाळ यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलिसांनी तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड आणि पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रिना मिसाळ, पोलीस हवालदार हरिश सोनभद्रे, अमित यादव, पोलीस शिपाई जीवन विघे, दीपक कुंभलकर व सहकाऱ्यांनी यशस्विरीत्या पार पाडली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.