नागपूर, दि. ३१ : जिल्हयातील सर्व महाविद्यालय तसेच शिष्यवृत्ती योजनेस सर्व पात्र विद्यार्थी यांना सुचित करण्यात येते की, सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्राकरीता महाडिबीटी पोर्टलवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती (फ्रिशीप), राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायीक पाठ्यक्रमासाठी निर्वाह भत्ता योजना या योजनांचे अर्ज ऑनलाईन सादर करणेकरीता दिनांक ३० जुन २०२५ पासुन महाडिबीटी पोर्टल कार्यान्वीत करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे योजनांचे अर्ज महाडिबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन भरून घ्यावे तसेच महाविद्यालयाने नोंदणीकृत झालेले अनुसूचीत जाती प्रवर्गातील शिष्यवृत्ती योजनेस पात्र असणा-या सर्व मॅट्रीकोत्तर अभ्यासक्रमात प्रवेशीत विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज तपासणी करून समाज कल्याण कार्यालयाकडे मंजूरी करीता सादर करावे. अनुसूचीत जाती प्रवर्गातील पात्र लाभार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासुन वंचीत राहणार नाही याची दक्षात घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.








