spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

३१ जुलै २०२६ पर्यंत राबविण्यात येत आहे ‘स्टॉप डायरिया कॅम्पेन,बालमृत्यू शून्यावर आणण्याचे ध्येय

चंद्रपूर :- बालकांमधील अतिसाराचे प्रमाण रोखण्यासाठी आणि अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर पोहोचवण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ‘स्टॉप डायरिया कॅम्पेन (SDC) २०२६’ राबविण्यात येत आहे. उन्हाळा आणि पावसाळा या हंगामामध्ये पूर किंवा नैसर्गिक आपत्ती दरम्यान अतिसाराच्या संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

“अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएस ची घेऊनी साथ” हे या मोहिमेचे मुख्य घोषवाक्य आहे.

मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आणि धोरण –

ओआरएस आणि झिंकचे वाटप –

अतिसार असलेल्या सर्व मुलांपर्यंत ओआरएस (ORS) आणि झिंकचे वाटप सुनिश्चित करणे आणि ५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरामध्ये याची उपलब्धता वाढवणे.

समुपदेशन व उपचार –

५ वर्षांखालील मुलांच्या पालकांचे अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी योग्य समुपदेशन करणे, तसेच बालकांमधील अतिसाराचे वेळेत निदान व उपचार करणे.

जोखीमग्रस्त भागांवर विशेष लक्ष –

अति जोखीम असणारी क्षेत्रे जसे की शहरी झोपडपट्ट्या, वीटभट्टी कामगार, पूरग्रस्त भाग, आरोग्य सेविका कार्यरत नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, स्थलांतरित मजूर आणि बेघर मुले यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

आरोग्य संस्थांचे बळकटीकरण –

अतिसारासह जलशुष्कता (Dehydration) असलेल्या बाल रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण केले जात आहे.

स्वच्छता आणि पाणीपुरवठा –

मागील २ वर्षांत अतिसाराची साथ आलेली क्षेत्रे, तसेच पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असलेल्या क्षेत्रांवर विशेष लक्ष दिले जाईल.

विविध विभागांचा समन्वय –

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागातर्फे इतर विभागांसोबत योग्य समन्वय साधून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. मनपा प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना, विशेषतः माता व पालकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या ५ वर्षांखालील बालकांची काळजी घ्यावी, परिसर स्वच्छ ठेवावा आणि अतिसाराची लक्षणे दिसताच त्वरित ओआरएस व झिंकचा वापर करावा.

Popular Articles