spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वाभिमान गहाण ठेवून तडजोडी करणारे लोकांच्या मनातून उतरले – डॉ. ढोके 

नागपूर :- स्वाभिमान गहाण ठेवून तडजोडी करायच्या नसतात, अशी बोचरी टीका प्रखर रिपब्लिकन वक्ते डॉ. एन. व्ही. ढोके यांनी आजच्या समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणात केली. यावेळी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध व्यावसायीक संजय सोनारकर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून हर्षवर्धन ढोके व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. ढोके म्हणाले, बाबासाहेबांना अपेक्षित रिपब्लिकन पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी हर्षवर्धन ढोके सारखा नेता लोकांमधूनच उभा करावा लागेल. नाहीतर स्वाभिमान बाजूला ठेवून नेतेगिरी करणारे नेते संसदेत कविता करीत बसतात किंवा लॉंगमार्च काढून इतर पक्षाच्या दावणीला बांधले जातात, अशी टीका डॉ. ढोके यांनी विद्यमान रिपब्लिकन नेत्यांवर केली. राजकारणात शत्रूला हरवण्यासाठी तडजोडी कराव्यात पण स्वाभिमान शाबूत ठेवावा लागतो. तो जर नसेल तर असे नेते लोकांच्या मनातून उतरतात. हर्षवर्धन ढोके म्हणाले, केवळ ब्राम्हणांना शिव्या देऊन कुठला विकास होत नाही. त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बांधणी करून राजकारण करावे लागेल. ऍड. किशोर गजभिये आणि संजय सोनारकर यांची समयोचित भाषणे झाली. संचालन ज्योती तिरपुडे यांनी केले. प्रिया कांबळे, विशाल शेंडे, जावेद पठाण, संतोष शिवणकर, सुचेंद्र मंडपे आदींचे सहकार्य लाभले.

Popular Articles