spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इनर व्हील क्लब ऑफ नागपूर ऑरेंज सिटीच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ १९ जुलै रोजी

– अध्यक्षपदी स्मिता बागडदेव तर सचिवपदी मोनिका वारोतकर -पदग्रहण सोहळा

नागपूर :- इनर व्हील क्लब ऑफ नागपूर ऑरेंज सिटीच्या वर्ष २०२६-२७ या सत्रासाठी नव्याने निवड झालेल्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ रविवारी १९ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला आहेत. या समारंभाला इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३०३ च्या जिल्हाध्यक्षा मनीषा चौधरी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून प्रियंका ठाकूर या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. यावेळी नव्या कार्यकारिणीकडे पदभार सोपविण्याचा औपचारिक सोहळा पार पडणार आहे. नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षा म्हणून स्मिता बागडदेव, आयपीपी डॉ. शारदा रोशनखेडे, उपाध्यक्षा राधा पटेल, सचिव मोनिका वारोतकर, कोषाध्यक्षा  सुप्रिया पाठक, आयएसओ वैशाली चिंचोलकर, संपादक सीमा मेटांगळे तसेच सीसीसीसी कोमल अकबरी यांची निवड झाली आहे. कार्यकारी प्रतिनिधी म्हणून रीता रावका, प्रीती जैन, मनीषा जैन, प्रीती नवले आणि ममता वालदे या कार्यरत राहणार आहेत. या पदग्रहण समारंभास इनर व्हीलच्या पदाधिकाऱ्यांसह विविध क्लबच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे. नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक उपक्रम तसेच विविध सेवाभावी कार्यक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास क्लबच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Popular Articles