spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

खापा, वार्ताहर :- सावनेर तालुक्यातील खापा सावनेर मार्गावरील कोदेगावजवळील एचपी पेट्रोल पंपासमोर गुरुवारी (ता. १६) दुपारी सुमारे २ वाजता अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

या अपघातात जितेंद्र बालचंद खंडाते (वय ३७, रा. सिरोंजी) हे गंभीर जखमी झाले. ते एमएच-४० बीटी-९२६० क्रमांकाच्या दुचाकीने सावनेरच्या दिशेने जात असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली खापा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मदतकार्य सुरू केले. हितज्योती आधार फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी जखमीला तातडीने सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे हलविण्यात आले.

जखमीसोबत कोणताही नातेवाईक नसल्याने हितेश बनसोड यांनी पुढाकार घेऊन रुग्णाला मेडिकलमध्ये दाखल केले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे परिसरात कौतुक होत असून खापा पोलिस अज्ञात वाहनचालकाचा शोध घेत आहेत.

Popular Articles