spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

न्यू एनर्जी बहुउद्देशीय संस्थेचा 24 वा, स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा

नागपूर :- न्यू एनर्जी बहुउद्देशीय संस्थेचा २४ वा स्थापना दिन विविध समाजोपयोगी उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी संस्थेच्या गेल्या २४ वर्षांतील बालसंगोपन, दत्तकग्रहण, महिला सक्षमीकरण, निराधार व अनाथ बालकांचे संगोपन तसेच शिक्षण क्षेत्रातील कार्याचा आढावा घेण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून हजारो बालके व महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याची माहिती देण्यात आली. स्थापना दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतील विद्यार्थिनी चेतना बारापात्रे हिने इयत्ता दहावीत ७७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच तिच्या इयत्ता अकरावीच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च संस्था उचलणार असल्याची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन पूजा झोडे यांनी केले तर आभार किशोरी ईटनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रितेश कर्णासे, अर्चना तागडे, नैना तामगाडे, समीक्षा मेश्राम, नीलिमा आवळे, तुळसा रामटेके व कुसुम चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले. स्थापना दिनाच्या समारंभाला संस्थेचे पदाधिकारी, संस्था योजनेचे कर्मचारी तसेच सुमारे २०० महिला व पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी स्वरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर स्नेहमेळावा व संगीत कार्यक्रमाने समारंभाची सांगता झाली.

Popular Articles