नागपूर :- जवाहर विद्यार्थी गृह, नागपूरच्या कार्यकारी मंडळाची सभा 15 जुलै 2026 रोजी, मुख्य कार्यालयात पार पडली. सभेत संस्थेच्या अध्यक्ष व मुख्य कार्यवाह पदाच्या निवडीचा विषय मंजूर करण्यात आला. यामध्ये अध्यक्षपदी नरेंद्रकुमार कृष्णा दिवटे तर (सचिव) पदावर हर्षवर्धन गोविंद बेले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यापूर्वी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे शेखर जयराम सावरबंधे तसेच मुख्य सचिव गंगाधर यशवंत काचोरे यांना कार्यकारी मंडळाने अनुक्रमे 30 मे 2026 आणि 7 जुलै 2026 रोजी झालेल्या सभांमध्ये पदमुक्त केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सभासद व समाजबांधवांना याची नोंद घेण्याचे आवाहन केले असून, माजी पदाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येणारे कोणतेही कार्यक्रम हे संस्थेचे अधिकृत कार्यक्रम समजू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले. संस्थेच्या आगामी अधिकृत कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. या सभेला कोषाध्यक्ष बालानंद टापरे, कार्यकारिणी सदस्य प्रवीण अंबागडे, प्रज्ञा बडवाईक, लोकनाथ भुरे, हरीश दांडेकर, कृष्णा घुगुसकर, विजय मोटघरे, प्रा. रमेश पिसे, अनिल सारखकर, प्रकाश तिळगुळे, रवी उराडे, सुखदेव वंजारी, प्रफुल्ल रेवतकर आणि नंदकिशोर थोटे उपस्थित होते. अशी माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष नरेंद्र कुमार दिवटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.




