– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. गुरुवार (ता.23)शोध पथकाने 73 प्रकरणांची नोंद करून 30,700 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 500 रूपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 54 प्रकरणांची नोंद करून 21,600 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 8 प्रकरणाची नोंद करून 800 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 1,200 रूपयाची वसुली करण्यात आली. दवाखाने,इस्पितळे, पॅथलॅब इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.
मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 3 प्रकरणांची नोंद करून 600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. अंजना सावजी यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्याने व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मोहन अग्रवाल यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले.
धरमपेठ झोन अंतर्गत मे. सॉलिड तंदुरी यांनी हॉटेलमध्ये चेंबर न आढळल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. हनीबनी एक्झीबिशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. चाकस वडा पाव यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्याने व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. एस.के.कंस्ट्रक्शन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. मनोहर स्वीटस् यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. बुधराज नमकीन भंडार यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्याने व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू.50,000 दंड वसुल केला.





