spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना, घडामोडींना वेग

मोठी बातमी समोर येत आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या 1 महिन्यापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली होती. त्यासाठी 20 जुलै रोजी संसदेवर भव्य असा मोर्चा देखील काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये विद्यार्थी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तसेच आंदोलकांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला, यामुळे देशभरात वातावरण चांगलंच तापलं.

कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला, देशभरातून विद्यार्थी जंतर मंतरवर दाखल झाले आणि या आंदोलनाने व्यापक रूप घेतलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी सोनम वांगचूक यांनी उपोषण सुरू केलं हतो. तब्बल 25 दिवस त्यांनी उपोषण केलं, त्यानंतर 26 व्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण सोडलं. परंतु जरी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं असलं तरी देखील धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं कॉकरोच जनाता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी जाहीर केलं होतं.

अखेर शुक्रवारी पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये देखील कॉकरोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम होतं. सरकारकडून त्यांना शनिवारी दुपारपर्यंतचा वेळ मागण्यात आला होता, मात्र त्याआधीचा आता धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. हे कॉकरोच जनाता पार्टीला मिळालेलं मोठं यश मानलं जात आहे.

दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. ते अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Credit source: टीव्ही 9 मराठी


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.