Home Latest News धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना, घडामोडींना वेग

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना, घडामोडींना वेग

0

<p>मोठी बातमी समोर येत आहे&comma; शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे&period; त्यानंतर आता घडामोडींना वेग आला असून&comma; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत&period; धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या 1 महिन्यापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं&period; कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली होती&period; त्यासाठी 20 जुलै रोजी संसदेवर भव्य असा मोर्चा देखील काढण्यात आला होता&period; या मोर्चामध्ये विद्यार्थी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले&period; पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या&comma; तसेच आंदोलकांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला&comma; यामुळे देशभरात वातावरण चांगलंच तापलं&period;<&sol;p>&NewLine;<p>कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला&comma; देशभरातून विद्यार्थी जंतर मंतरवर दाखल झाले आणि या आंदोलनाने व्यापक रूप घेतलं&period; शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी सोनम वांगचूक यांनी उपोषण सुरू केलं हतो&period; तब्बल 25 दिवस त्यांनी उपोषण केलं&comma; त्यानंतर 26 व्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण सोडलं&period; परंतु जरी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं असलं तरी देखील धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाही&comma; तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं कॉकरोच जनाता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी जाहीर केलं होतं&period;<&sol;p>&NewLine;<p>अखेर शुक्रवारी पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली&comma; या बैठकीमध्ये देखील कॉकरोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम होतं&period; सरकारकडून त्यांना शनिवारी दुपारपर्यंतचा वेळ मागण्यात आला होता&comma; मात्र त्याआधीचा आता धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे&period; हे कॉकरोच जनाता पार्टीला मिळालेलं मोठं यश मानलं जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे&comma; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत&period; ते अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>Credit source&colon; टीव्ही 9 मराठी<&sol;strong><&sol;p>&NewLine;

Exit mobile version