Home Latest News भंडारा जिल्ह्यात पावसाची हजेरी; गोसेखुर्द प्रकल्पाचे १३ दरवाजे उघडले जिल्ह्यात ‘ग्रीन अलर्ट’...

भंडारा जिल्ह्यात पावसाची हजेरी; गोसेखुर्द प्रकल्पाचे १३ दरवाजे उघडले जिल्ह्यात ‘ग्रीन अलर्ट’ कायम असून वैनगंगा नदी सध्या इशारा पातळीच्या खाली

0

<p><strong>हंसराज&comma;भंडारा &colon;-<&sol;strong> जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २४ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या दैनिक अहवालानुसार&comma; जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून प्रमुख जलप्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे&period; गोसेखुर्द प्रकल्पाची पाणी पातळी ५६&period;२२ टक्क्यांवर पोहोचली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे १३ दरवाजे ०&period;५० मीटरने उघडण्यात आले आहेत&period; यातून १६०५&period;११ क्युमेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे&period; तसेच धापेवाडा प्रकल्पाचे १७ दरवाजे २&period;०० मीटरने उघडण्यात आले असून तेथून १७४५&period;०५ क्युमेक विसर्ग सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे&period; पुजारीटोला प्रकल्प ८८&period;१३ टक्के भरला असून बावनथडी २२&period;८६ आणि संजय सरोवर ६३&period;१० टक्के भरले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी पाहता सरासरी ६&period;२ मिमी पावसाची नोंद झाली आहे&period; यामध्ये मोहाडी आणि लाखनी तालुक्यात सर्वाधिक ७&period;९ मिमी पाऊस पडला&period; साकोली ७&period;५&comma; à¤¤à¥à¤®à¤¸à¤° ७&period;२&comma; भंडारा ५&period;४ आणि पवनी तालुक्यात ४&period;९ मिमी पावसाची नोंद झाली असून लाखांदूर तालुक्यात सर्वात कमी ३&period;३ मिमी पाऊस पडला आहे&period; १ जून २०२६ पासून आतापर्यंत जिल्ह्याची पावसाची एकूण सरासरी ७९&period;३ टक्क्यांवर पोहोचली आहे&period; वैनगंगा नदी सध्या २४३&period;८० मीटरवर वाहत असून ती २४५&period;०० मीटरच्या इशारा पातळीच्या खाली आहे&period; खबरदारीचा उपाय म्हणून भंडारा ते कारधा हा लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून इतर सर्व मार्ग सध्या सुरू आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार&comma; जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही&period; नैसर्गिक आपत्तीमुळे घरांचे नुकसान&comma; जनावरांचा मृत्यू किंवा संपर्क तुटल्याची कोणतीही नोंद झालेली नाही&period; सध्या जिल्ह्यासाठी &&num;8216&semi;ग्रीन अलर्ट&&num;8217&semi; देण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे&period; नदीपात्रातील विसर्गामुळे आणि पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरू नयेत यासाठी नागरिकांनी आरोग्यविषयक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version