नागपूर :- NMC-OCW ने २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० ते रात्री ११.०० या वेळेत किल्ला महाल फीडरवर १२ तासांचा शटडाऊन नियोजित केला आहे. किल्ला महाल येथील ‘इनलेट फ्लो मीटर’ (Inlet flow meter) बदलण्याच्या कामासाठी हा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
यामुळे खालील वितरण क्षेत्रांमधील (CAs) पाणीपुरवठा प्रभावित होईल –
१. किल्ला महाल वितरण क्षेत्र (CA) –
बापू महाजन गल्ली, गजानन महाराज गेट, झेंडा चौक, मातृसेवा संघ संप (sump), किल्ला गेट संप, गायत्री कॉम्प्लेक्स, कल्याणेश्वर मंदिर, उपाध्ये गल्ली, तुळशीबाग रोड, भोसले कॉलनी, अलीखांब, भूतेश्वर नगर, शिवाजी नगर, नंदाजी नगर, नवाबपुरा, संघ बिल्डिंग (P), कोठी रोड, दसरा रोड, राहतेकर वाडी, गायत्री कॉन्व्हेंट.
पाणीपुरवठ्यातील या शटडाऊनच्या काळात सहकार्य करण्याचे आणि पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन NMC-OCW कडून सर्व ग्राहकांना करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा किंवा बिल भरण्याबाबत अधिक माहिती किंवा मदतीसाठी, ग्राहक NMC-OCW च्या हेल्पलाईन क्रमांक १८०० २६६ ९८९९ वर संपर्क साधू शकतात, contact@ocwindia.com या ईमेलवर संपर्क साधू शकतात किंवा Play Store किंवा App Store वरून ‘Nagpur Jal Grahak Sewa App’ डाउनलोड करू शकतात.





