spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूरच्या डॉ. मोतीलाल चौधरी यांना ‘नॅशनल बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड २०२६’

नागपूर :-  नागपूरचे सुप्रसिद्ध रिअल इस्टेट उद्योजक, माई ग्रुपचे प्रमुख तथा माई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. मोतीलाल चौधरी यांना नवी दिल्ली येथील हॉटेल लीला अँबियन्समध्ये आयोजित नॅशनल लीडरशिप कॉन्क्लेव्ह २०२६ मध्ये ‘नॅशनल बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. ग्लोबल एक्सलन्स फोरमच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्यात भारतातील विविध राज्यांतील उद्योगपती, उद्योजक, शिक्षण, एव्हिएशन, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि इतर क्षेत्रांतील मान्यवरांसह आफ्रिका, जर्मनी, अमेरिका, युनायटेड किंग्डम, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आदी देशांतील सुमारे ५०० प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री डॉ. रघुवीर सिंह यांच्या हस्ते डॉ. चौधरी यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. मोतीलाल चौधरी यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना सामाजिक बांधिलकीही जपली आहे. वयाच्या १९व्या वर्षापासून दरवर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान करण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे. त्यांच्या माई फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे, रक्तदाब व मधुमेह तपासणी, दंत व नेत्र तपासणी, गरजूंना मोफत चष्म्यांचे वितरण, होमिओपॅथिक उपचार, वृक्षारोपण, अखंड भारत रॅली, गरजूंना मदत तसेच रोजगारनिर्मिती यांसारखे विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्यांच्या सामाजिक व व्यावसायिक योगदानाची दखल घेत यापूर्वी त्यांना ‘समाजाचा गौरव’ (२०१८), अमेरिकन ईस्ट कोस्ट विद्यापीठाची मानद डॉक्टरेट (२०२३), महाराष्ट्र उद्योग पुरस्कार (२०२३), इंडियन आयकॉन अवॉर्ड (२०२४), नॅरेडको प्राईड ऑफ रिअल इस्टेट अवॉर्ड (२०२५) आणि भारत सन्मान (२०२५) यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

‘नॅशनल बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ हा त्यांच्या कार्यातील आणखी एक मानाचा टप्पा ठरला आहे. या सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पद्मश्री गायक अनुप जलोटा, अरुणाचल प्रदेशचे मंत्री लेओ लिबांग, खासदार डॉ. रवींद्र नारायण बेहरा, इंडियन आयडॉल फेम गायिका श्रेष्ठा शर्मा, गझल गायक कुमार सत्यम, वरिष्ठ आयएएस अधिकारी राजीव रंजन तसेच ग्लोबल एक्सलन्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवि (जितेंद्रकुमार), अध्यक्ष नईम तिरमीजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परिषदेत “विकसित भारत २०४७” या विषयावर देश-विदेशातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी माई ग्रुपचे प्रकाश बघेले, निलेश बोपचे, शिवकुमार पारधी, जैलाल पटले, उमेश महंत, हिरालाल पराडकर, श्रीकृष्ण तळेगावकर, शेखर अलोणे आदी उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्या नंतर डॉ. मोतीलाल चौधरी यांनी या यशाचे श्रेय आई- वडिलांचे आशीर्वाद, गुरुजनांचे मार्गदर्शन, कुटुंबीयांचे प्रेम, माई ग्रुपमधील सहकारी, कर्मचारी आणि मित्रपरिवार यांच्या सहकार्याला दिले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.