गडचिरोली :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 16 ते 17 जुलै 2026 रोजी जिल्हास्तर 65 वी सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल, मुलचेरा ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथे करण्यात आले आहे. सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन समारंभ दि. 16 जुलै, 2026 रोजी करण्यात आले असून या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन भास्कर घटाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली, एम.एस. सरकार, मुख्याध्यापक, प्रशांत मल्लीक, शारीरिक शिक्षक, प्रदिप देबनाथ, शारीरिक शिक्षक, आर.एन.टी. विद्यालय, भवानीपूर. एस.बी. बडकेलवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक, भोयर, क्रीडा शिक्षक, जि.प. माध्यमिक विद्यालय, तथा तालुका संयोजक, एटापल्ली, शुीाम मजुमदार, प्रशिक्षक, लॉएट मेटल, गडचिरोली यांच्या प्रमुख उपस्थित द्विप प्रज्वलन व मैदानाचे पुजन करुन सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. स्पर्धेची सुरुवात दि. 16 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता झाली. यामध्ये 15 वर्षे वयोगट मुले या वयोगटात रविंद्रनाथ टागोर माध्यमिक विद्यालय, भवानीपुर ही शाळा विजयी ठरली तर नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल तथा ज्युनियर कॉलेज, सुंदरनगर ही शाळा उपविजयी ठरली. तर 17 वर्षाखालील मुले या वयोगटात नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल तथा ज्युनियर कॉलेज, सुंदरनगर ही शाळा विजयी ठरली तर इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कुल तथा ज्युनियर कॉलेज, सुभाषग्राम ही शाळा उपविजयी ठरली. विजयी सर्व वयोगटातील संघ गोंदिया येथे आयोजीत होणाऱ्या नागपूर विभागीय स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सर्व विजयी संघाला विभागीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.








