बेला :- येथील केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,सालईराणी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख बोरजे होत्या.याप्रसंगी सरपंच सोनाली पेंदाम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन आत्राम,भोजराज कुडुमते,शंकर गिरसावळे प्रामुख्याने उपस्थित होते.
शिक्षण परिषदेत शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रफुल नरताम यांची पदोन्नतीने वाडी येथे केंद्रप्रमुख पदोन्नतीने नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून भावपूर्ण निरोप देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी त्यांचा गुणगौरव करीत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.परिषदेला बेला केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्वेता कुर्झडकर यांनी केले. विद्याधर कन्नाके यांनी उपस्थितांचे आभार मानले.वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.





