spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्व.प्रभाकरराव दटके डायग्नोस्टिक सेंटरचे लवकरच भूमिपूजन

नागपूर :- महाल भागात स्व. प्रभाकरराव दटके डायग्नोस्टिक सेंटरच्या बांधकामाचे भूमिपूजन लवकरच करण्याचा निर्णय मनपा मुख्यालयातील सभाकक्षात झालेल्या उच्चस्तरिय बैठकीत घेण्यात आला. यावेळी महापौर निता ठाकरे, आमदार प्रवीण दटके, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, आयुक्त डॉ. विपीन, नगरसेवक सचिन नाईक, मुख्य अभियंता लिना उपाध्ये, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त निर्भय जैन, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक ऋतुराज जाधव, कार्यकारी अभियंता अश्विनी येलचेटवार, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार उपस्थित होते.

शहरातील नागरिकांना माफक दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्व. प्रभाकरराव दटके डायग्नोस्टिक सेंटरची उभारणी केली जात आहे. यासाठी राज्य सरकारने 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, पार्किंगसह पाच मजली इमारत उभी केली जाणार आहे. यात ब्लड बँक, पॅथॉलॉजी, फिजिओथेरपीसह तत्सम रोगनिदान सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय रोगनिदान शिबीरे आयोजित करण्यासाठी सभागृह राहणार आहे. या सर्व सुविधा नागरिकांना अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार आहे.

एकाच छताखाली सर्व आरोग्य सुविधा

या डायग्नोस्टिक सेंटरचा उपयोग या परिसरातील गरिबांना होईल. एकाच छताखाली सर्व आरोग्य सुविधा लोकांना उपलब्ध करून देण्याचा हा एक लोकाभिमुख प्रयत्न असल्याचे आमदार प्रवीण दटके यांनी या बैठकीनंतर सांगितले.

दुसऱ्या टप्प्याचा आराखडा तयार करा : आयुक्त डॉ. विपीन

यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी या डायग्नोस्टिक सेंटरसाठी पहिल्या टप्प्यात दोन मजल्यासाठी इमारतीचा आराखडा मंजूर झालेला आहे. उर्वरित तीन मजल्यांसाठीचा दुसर्या टप्प्याचा आराखडा त्वरित तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी प्रशासनाला दिले.

Popular Articles