spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर सुधार प्रन्यासातील अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी; शिवसैनिकांचा धरणे आंदोलनाचा इशारा

नागपूर :- नागपूर सुधार प्रन्यासातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर आक्षेप घेत शिवसैनिकांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. याबाबत कार्यकारी अधिकारी अनिल राठोड यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांची बाजू घेतली जात असल्याचा अनुभव आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात कार्यकारी अधिकारी अनिल राठोड, दीपाली पिसे, नीलम तसेच संबंधित दिपालीचे पती कारचालक यांच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शिवसैनिकांनी नागपूर सुधार प्रन्यासाच्या सभापतींकडे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.

मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयाच्या पार्किंग परिसरात लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नागपूर सुधार प्रन्यास प्रशासन व संबंधित अधिकारी यांची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला निरंजन दहिवले, नंदकिशोर माटे, सुनील मेश्राम सतिश उके, वैष्णवी लेपांडे, होमेश्वर लेपांडे, किशोर सोमकुवर उपस्थित होते.

Popular Articles