spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

संजय राऊत, राहुल गांधींची पळपुटे विरोधक म्हणून इतिहासात नोंद होणार

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली निर्भत्सना 

परीक्षा विधेयक मंजूर होत असताना राहुल गांधी, काँग्रेस आणि संजय राऊत यांनी संसदेतून पळ काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वात यापुढे पेपरफुटी झाली तर दहापट शिक्षा आणि दहापट दंड वसूल केला जाणार आहे. असे ऐतिहासिक विधेयक मंजूर होत असताना विरोधकांनी पळ काढला. कारण तुम्हाला या देशातील विद्यार्थ्यांचे हित नको आहे. तुम्हाला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आणि राहुल गांधींचे हित हवे आहे. देशाच्या इतिहासात तुमची नोंद पळपुटे विरोधक म्हणून केली जाणार आहे, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी विरोधी पक्षांची निर्भत्सना केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अभिजीत दीपके यांचा विष्णूचा अवतार म्हणून गौरव करत देव-देवतांचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला कीव येत आहे. जनाब संजय राऊत, तुम्हाला त्यांच्या बुद्धीची कीव आली नाही का?, असा सवाल करून बन म्हणाले, पुणेकरांनी अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना पुरस्कार देत गौरव करण्याचा निर्णय घेतला तर संजय राऊत यांच्या पोटात का दुखते? अमित शहा यांचे कर्तृत्व काय आहे, हे देशाने पाहिले आहे. संजय राऊतांना लोकमान्य टिळक यांचे नाव घेण्याचाही तुम्हाला अधिकार नाही. कारण तुम्ही आता राहुल गांधींची गुलामी करत आहात. तुम्ही आता महाराष्ट्राचे आणि हिंदुस्थानचे भक्त नाही. सोनिया गांधींचे गुलाम म्हणून काम करण्याची जबाबदारी तुमच्यावर आली आहे आणि ती तुम्ही पार पाडत आहात. तुम्हाला भांडुपच्या गाढव नाक्याचाही पुरस्कार दिला जात नाही त्याबद्दल आत्मपरीक्षण करा, असे बन यांनी सुनावले.

संजय राऊत, ईस्ट इंडिया कंपनीची तुलना भाजपासोबत करताना आपण भ्रष्ट इंडिया कंपनीत आहात, याची जाणीव ठेवा. कारण तुमची इंडिया आघाडी भ्रष्ट असल्याने जनतेने तुमचे नामकरण ‘भ्रष्ट इंडिया कंपनी’ असे केले आहे. आपण स्वतः भ्रष्ट इंडिया कंपनीचे चालक – मालक आहोत, याचे भान भाजपावर टीका करताना बाळगा. ईस्ट इंडिया कंपनीला या देशातून हाकलण्याचे काम देशातील नागरिकांनी केले. आणि तुमच्या भ्रष्ट इंडिया कंपनीला घालवण्याचे, नाकारण्याचे आणि घरी बसवण्याचे कामही देशातील जनतेने केले असल्याचे बन म्हणाले.

‘इधर से आलू डालूंगा, उधर से सोना निकालूंगा’ हे संशोधन करणाऱ्या राहुल गांधींना या जगातलाच नाही तर अंतराळातलाही एखादा पुरस्कार दिला पाहिजे. या संशोधनाबद्दल संजय राऊत तुम्ही नेमक्या कुठल्या पुरस्काराची घोषणा करणार आहात? हा पुरस्कार देण्यासाठी संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नाही, आंतरराष्ट्रीय नाही, तर अंतराळातील एक संस्था स्थापन केली पाहिजे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नका. काही गाड्यांवर हातांचे ठसे असतात. त्या ठशांच्या माध्यमातून गुन्हेगारांचा तपास पोलीस अधिकारी करतात त्या संदर्भात चंद्रकांत पाटील यांचे ते वक्तव्य होते, असे बन यांनी स्पष्ट केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.