नागपूर :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली कॉटन मार्केट येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन सीताबर्डी मार्केट मार्गे व्हरायटी चौक येथे पोहोचली. रॅलीत मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. व्हेरायटी चौक येथे आयोजित सभेत कॉ.अरुण लाटकर व कॉ. डॉ. युगल रायलू यांनी मार्गदर्शन केले. कॉ. अरुण लाटकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. तर कॉ. डॉ. युगल रायलू यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये, त्यांचे विचार आणि समाजप्रबोधनातील योगदान याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे भूषण आहेत. त्यांच्या कार्याचा जागतिक स्तरावर गौरव झाला असून रशियातील मॉस्को येथे त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. रॅलीनंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दीक्षाभूमी परिसरातील अण्णाभाऊ साठे स्मरणस्थळी जाऊन त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कॉम. रवींद्र पराते, कॉम. सुनिल शेंडे, कॉम. अजय साहू, कॉम. मनोहर मुळे आणि श्याम काळे यांची उपस्थिती होती.
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भाकप व माकपतर्फे अभिवादन रॅली


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




